पुढारी ऑनलाईन: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांचा दौरा 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वप्रथम ते २८ फेब्रुवारीला कझाकिस्तानला भेट देतील. येथे द्विपक्षीय चर्चेनंतर ते उझबेकिस्तानलाही भेट देतील. त्यानंतर अँटनी 1 मार्च रोजी G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एएनआयने म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन 1 मार्च रोजी भारतात असणार आहेत. ते G-20 च्या शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बहुपक्षीयता बळकट करण्यावर आणि अन्न, ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास यावर सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. शिवाय ते भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी भारतीय राजकारणी आणि अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ही माहिती दिली.
यावर्षीपासून भारताकडे जगातील सर्वात शक्तिशाली गट G-20 चे अध्यक्षपद आहे. जगातील सर्व विकसित देशांचा G-20 गटात समावेश आहे, ज्यांचा जागतिक GDP मध्ये सुमारे 85 टक्के वाटा आहे. G-20 देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येच्या 60%, जागतिक GDP च्या 85% आणि जागतिक व्यापाराचा 75% समावेश आहे. तसेच G-20 गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, तुर्की, युनायटेड किंगडम-स्टेट्स आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.