फेसबुकची मूळ कंपनी Meta मध्ये आणखी नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना नारळ?

फेसबुकची मूळ कंपनी Meta मध्ये आणखी नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना नारळ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुकची (Facebook) ची मूळ कंपनी Meta Platforms Inc आणखी नोकरकपात करण्याची योजना आखत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कंपनी पुनर्रचना आणि खर्च कपातीचा एक भाग म्हणून मनुष्यबळ कमी करण्याची तयारी करत आहे. या नोकरपातीचा हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. या वृत्तावर कंपनीने कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्या महिन्यात कंपनीच्या अंतर्गत बैठकीत आणखी नोकरकपात करणार असल्याचे संकेत दिले होते. गेल्या वर्षी कंपनीने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. हे प्रमाण एकूण मनुष्यबळापैकी १३ टक्के आहे. वाढता खर्च आणि जाहिराती कमी झाल्याने मेटाने ही नोकरपात केली होती. या वृत्तानुसार, यावेळी झुकेरबर्ग यांनी ChatGPT सारख्या AI टूल्सवरही चर्चा केली जी कोडिंगसाठी इंजिनियर्स आणि नॉन-इंजिनियर्सना मदत करेल.

झुकेरबर्ग यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांना सांगितले होते की "गेल्या वर्षी केलेली नोकरकपात ही कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक सुरुवात होती आणि पण हा शेवट नाही." कंपनीच्या स्ट्रक्चरमध्ये समतोल राखण्याचा आणि मध्यम स्तरावरील नोकऱ्या कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Meta च्या १८ वर्षांच्या कामगिरीत गेल्या वर्षी केलेली नोकरकपात ही पहिलीच होती. इतर टेक कंपन्यांनीदेखील हजारो नोकऱ्या कमी केल्या आहेत. ज्यात Google ची मूळ कंपनी अल्फाबेट इंक, मायक्रोसॉफ्ट कॉर्प आणि स्नॅप इंक यांचा समावेश आहे.

मेटाच्या उलाढालीत घट

कोविड महामारीच्या काळात मेटाने सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली होती. पण २०२२ मध्ये त्यांच्या व्यवसायाला फटका बसला. यामुळे मेटाने कॉस्ट कटिंग सुरु केले आहे. मेटाची उलाढाल १ ट्रिलियन डॉल पेक्षा जास्त होती. पण आता ती ४४६ अब्ज डॉलरवर आली आहे. दरम्यान, बुधवारी मेटाचे शेअर्स सुमारे ०.५ टक्क्यांनी खाली आले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news