47 टक्के जपानींना मिळत नाही मनासारखा जोडीदार | पुढारी

47 टक्के जपानींना मिळत नाही मनासारखा जोडीदार

टोकियो : एक अजब समस्या जपानमध्ये निर्माण झाली असून, तेथील विवाहेच्छुक 47 टक्के तरुण, तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. जोडीदार शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही हे एक त्यामागचे कारण सांगण्यात येते. ही आकडेवारी सरकारी सर्व्हेतून समोर आली आहे.

सरकारच्या ऑनलाईन सर्व्हेत 20 ते 40 वयोगटातील 4 हजार पुरुष व महिलांनी सहभाग घेतला. पैकी 47 टक्के लोकांनी सांगितले, की आम्ही लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्यात अपयशी ठरलो आहोत. जपानच्या घटत्या जन्मदराचाही उल्लेख या अहवालात आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 29 टक्के लोकांनी सांगितले, की आमच्याकडे लग्न करण्याएवढे पैसे नाहीत, तर बहुतांश लोकांनी म्हटले, की जोडीदार शोधण्यासाठी वेळच मिळाला नाही. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. बंधनात राहणे आम्हाला आवडत नसल्यामुळे आम्ही लग्न करणार नाही, असे 31 टक्के तरुणींनी सांगितले.

Back to top button