Queen Consort Camilla : ब्रिटनच्या राणी कॅमिला यांचा 'कोहिनूरजडीत मुकुट' घालण्यास नकार; भारताला परत मिळणार हिरा? | पुढारी

Queen Consort Camilla : ब्रिटनच्या राणी कॅमिला यांचा 'कोहिनूरजडीत मुकुट' घालण्यास नकार; भारताला परत मिळणार हिरा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे नवे राजे म्हणजेच राजा चार्ल्स तिसरा यांचा या वर्षी मे महिन्यात राज्याभिषेक होणार आहे. राजघराण्यासाठी हा प्रसंग खूप खास आहे. गेल्या वर्षी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजा चार्ल्सची पत्नी कॅमिला (Queen Consort Camilla) या नवीन राणी बनल्या आहेत. त्यांनी राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी कोहिनूर मुकुट घालणार नसल्याचे सांगितले आहे. भारताकडून या कोहिनूर हिऱ्याला परत घेऊन येण्याची चर्चा सध्या जोरात आहेत. त्यामुळे आता राणी कॅमिला यांच्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोहिनूरऐवजी दुसरा मुकुट घालणार असल्याचं राणी कॅमिला यांनी म्हटले आहे.

एका अहवालानुसार, राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर आणि इतर मौल्यवान रत्ने राणी कॅमिला (Queen Consort Camilla) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ६ मे रोजी होणाऱ्या राज्याभिषेकात हा मुकुट परिधान केला जाणार नाही.

Britain's Queen Consort Camilla will not wear disputed Koh-i-Noor diamond for coronation - The Globe and Mail

 

क्वीन मेरीचा मुकुट धारण करणार राणी कॅमिला

राणी कॅमिला यांनी आता राणी मेरीचा मुकुट धारण करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावरही कोहीनूरसारखा हिरा लावण्यात आला आहे; मात्र तोही ब्रिटिशांनी अन्य देशातून लुटून आणलेला आहे, असे म्हटले जात आहे. क्वीन मेरीचा हा मुकुट टॉवर ऑफ लंडनमधून काढला जाईल आणि त्यातील रत्नांमध्ये काही बदल केले जातील. हा मुकुट 100 वर्षांहून अधिक जुना आहे. क्वीन मेरी यांनी 1911 मध्ये हा मुकुट घातला होता.

Cry over Kohinoor? Queen Consort Camilla to NOT wear coveted diamond at coronation

कोहिनूरशी भारताचे विशेष नाते

ब्रिटनने भारतावर शेकडो वर्षे राज्य केले आहे. 1849 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबवर कब्जा केला तेव्हा हा हिरा तत्कालीन ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. नंतर ते आणि इतर अनेक हिरे ब्रिटनच्या शाही मुकुटात ठेवण्यात आले. आता भारतासह एकूण 4 देशांचा दावा आहे की कोहिनूर त्यांचा आहे त्यामुळे तो त्यांना परत करावा.

Kohinoor Diamond's Inclusion in Queen Consort's Crown Could Spark  Controversy | Ancient Origins

हेही वाचा

Back to top button