किमोथेरपी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किती प्रभावी, हे आता शस्त्रक्रियेआधीच कळणार | पुढारी

किमोथेरपी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किती प्रभावी, हे आता शस्त्रक्रियेआधीच कळणार

वॉटर्लू, वृत्तसंस्था :  ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथून पुढे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरने पीडित महिलेवर किमोथेरपी शस्त्रक्रिया कितपत परिणामकारक ठरेल, फायद्याची ठरेल की नाही, हे आता शस्त्रक्रियेआधीच कळू शकणार आहे.

कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठातील अभियंत्यांनी विकसित केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने ते शक्य होईल. या तंत्रज्ञानातून किमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून बचाव व शस्त्रक्रियेचे परिणाम अधिक सकारात्मक करण्यातही मदत होऊ शकते. ओपन सोर्स कॅन्सर-नेट या चमूने ही बाब प्रयोगसिद्ध करून दाखविली आहे. या चमूचे नेतृत्व डॉ. लेक्झांडर वोंग यांनी केले. प्रात्यक्षिकाच्या निष्कर्षांनी आम्ही समाधानी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णासाठी नेमका उपचार ठरविणे आजही फार कठीण आहे. दुष्परिणामांपासून बचावही महत्त्वाचा आहे. रुग्णावर किमोथेरपी किंवा सर्जरी कितपत उपकारक ठरेल, याबद्दलचे भाकीत आम्ही विकसित केलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम वर्तवू शकते.
– डॉ. अॅलेक्झांडर वोंग, ओपन सोर्स कॅन्सर-नेट, वॉटर्लू विद्यापीठ

Back to top button