स्पाय बलूनवरून अमेरिकेचा चीनला इशारा | पुढारी

स्पाय बलूनवरून अमेरिकेचा चीनला इशारा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था :  अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला बुधवारी संबोधित केले. चीनने अमेरिकेवर सोडलेल्या स्पाय बलूनवरून बायडेन यांनी चीनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला.

अमेरिका चीनसोबत जगाच्या हितासाठी काम करायला तयार आहे; पण चीनकडून धोका झाल्यास अमेरिका आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सारे काही करेल, असे बायडेन म्हणाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, आम्हाला स्पर्धा चालेल; पण संघर्ष अजिबात नको, असा उल्लेखही बायडेन यांनी केला.

बलूनचे अवशेष चीनला देण्यास अमेरिकेचा नकार

चिनी स्पाय बलूनच्या अवशेषातून चीनच्या हेरगिरीचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असताना चीनने अमेरिकेकडून ते ताब्यात मागितले आहेत; मात्र अमेरिकेने ते परत करण्यास सपशेल नकार दिला आहे.

Back to top button