अणू हल्ल्यासाठी चीनकडून बलूनच्या साहाय्याने चाचणी? | पुढारी

अणू हल्ल्यासाठी चीनकडून बलूनच्या साहाय्याने चाचणी?

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : आमचे बलून हवामानाची माहिती गोळा करत होते, हा चीनचा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने फेटाळून लावला आहे. चीनपासून 12 हजार किलोमीटर दूर, जमिनीपासून 24 किलोमीटर उंचीवर चिनी बलून कुठली हवामानाची माहिती गोळा करीत होते, असा खडा सवाल अमेरिकेने चीनला उद्देशून केला आहे. अणू हल्ल्यासाठीही चीनची ही नवी पद्धत असणे शक्य आहे, असाही पेंटॅगॉनचा कयास आहे. जानेवारी 2022 मध्ये चीनचा असाच एक बलून भारताच्या हद्दीवरूनही गेला होता, असा खळबळजनक दावा अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञ एच. आय. सटन यांनी केला आहे. सटन यांनी नमूद केलेल्या वेळेदरम्यान भारतातील अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरवर चिनी गुप्तहेर बलून उडाले होते. तेव्हा सोशल मीडियावर या बलूनचा अणुबॉम्ब वाहू बलून?

चीनसारख्या शत्रू देशाने सोडलेले बलून अमेरिकेत अण्वस्त्रे टाकू शकतात, इलेक्ट्रिकल ग्रिडमध्ये व्यत्यय आणू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. याआधी दुसर्‍या महायुद्धादरम्यान 5 मे 1945 रोजी अमेरिकेतील ब्ले शहरात जपानने गनपावडरने भरलेले मोठे बलून टाकले होते. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. फोटोही व्हायरल झाला होता.

असे पाडले बलून

कॅरोलिना किनारपट्टीपासून 6 मैल अंतरावर सर्व प्रकारची हवाई वाहतूक आधी बंद करण्यात आली. 60 ते 65 हजार फूट उंचीवर हे बलून उडत असतानाच फायटर जेटने ते पाडले.

‘या’ देशांत चीनची बलूनने हेरगिरी

भारत : जानेवारी 2022 मध्ये पोर्टब्लेअरच्या आकाशात हे बलून दिसले. फेब्रुवारी 2020 मध्ये चीनचे हेरगिरी बलून जपानवरून गेले होते.
कोलंबिया : फेब्रुवारी 2023 मध्ये कोस्टारिकात हे बलून आढळून आले. फेब्रुवारी 2023 मध्ये मोंटानात दिसले आणि अमेरिकेने पाडले.

Back to top button