उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन पुन्हा 'बेपत्ता', उलट-सुलट चर्चेला उधाण | पुढारी

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन पुन्हा 'बेपत्ता', उलट-सुलट चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हे पुन्‍हा एकदा बेपत्ता झाले आहेत. गेल्‍या एक महिन्‍यापासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रकृतीबाबत पुन्‍हा उलट-सूलट चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, किम जोंग उन एका महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. विशेष म्‍हणजे मागील आठवड्यात राजधानी प्योंगयांगमध्ये नियोजित परेडपूर्वीपासूनच ते बेपत्ता झाल्‍याने उत्तर कोरियात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ( Kim Jong Un missing )

Kim Jong Un missing : महत्त्‍वाच्‍या बैठकीला किम जोंग उन गैरहजर

या बाबत ‘फॉक्‍स न्‍यूज’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, रविवार ५ फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियातील महत्त्‍वाच्‍या बैठक झाली. यावेळी किम जोंग उन उपस्‍थित नव्‍हते. आशा महत्त्‍वाच्‍या बेठकीला गैरहजर राहण्‍याची त्‍याचीही तिसरी वेळ आहे. उत्तर कोरियाकडे असणारी अण्वस्त्रे अमेरिकेसह आशियातील मित्र राष्ट्रांसाठी देखील चिंताजनक विषय आहेत.

स्थानिक मीडियाने याबाबत म्हटले आहे की, सोमवारी सत्ताधारी पक्षाच्‍या केंद्रीय लष्करी आयोगाची बैठक झाली. सैन्य उभारणीसाठी प्रदीर्घकालीन समस्या या विषयावर या वेळी चर्चा झाली. कोरियन पीपल्स आर्मीचा संदर्भ देत स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, “प्रचलित परिस्थितीचा सामना करण्यासाठी KPA च्या ऑपरेशन आणि लढाऊ कवायतींचा विस्तार वाढवणे आणि युद्धाची तयारी अधिक काटेकोरपणे करणे या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली”

किम जोंग गंभीर आजारी नसतील, तर ते पुढील महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतील, असे मानले जात आहे.

हेही वाचा :

 

Back to top button