Pope Francis | पोप फ्रान्सिस भारतात येणार, आगामी दौऱ्याविषयी दिली माहिती | पुढारी

Pope Francis | पोप फ्रान्सिस भारतात येणार, आगामी दौऱ्याविषयी दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस (Head of the Catholic Church Pope Francis) पोर्तुगालनंतर भारत, मंगोलिया दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी सांगितले की ते पुढच्या वर्षी भारताला भेट देण्याचे नियोजन आखत आहेत आणि २०२३ नंतर मंगोलियाच्या संभाव्य दौऱ्याबाबत विचार करत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी दक्षिण सुदान येथून रोमला परत येताना त्याच्या आगामी दौऱ्याच्या वेळापत्रकाची रूपरेषा आखली आहे. पोप फ्रान्सिस यांनी काँगो आणि दक्षिण सुदानच्या सहा दिवसांच्या दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी दौऱ्यावर माहिती दिली.

त्यांनी पुष्टी केली आहे की ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जागतिक युवा दिनासाठी लिस्बन, पोर्तुगाल येथे जाणार आहेत आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये फ्रान्समधील मार्सेली येथे त्यांची बिशपांसोबत बैठक होईल. ते मार्सेलीहून मंगोलियाला जातील. मंगोलियाला ते पहिल्यांदाच जाणार आहे.

पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले की २०२४ मध्ये मी भारताला भेट देईन. ते २०१७ मध्ये भारतात येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द झाला होता.

दरम्यान, धर्मगुरू तसेच नन यांनी ऑनलाईन पोर्नोग्राफी पाहणे टाळायला हवे, असा सल्ला नुकताच पोप फ्रान्सिस यांनी दिला होता. मी माझ्या जीवनात कधीच मोबाईल फोनचा वापर केलेला नाही. फोनचा वापर करणाऱ्यांनी त्याचा वापर चांगल्या संपर्कासाठी करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. (Pope Francis)

 हे ही वाचा :

Back to top button