‘या’ जंगलात माणूस होतो गायब | पुढारी

‘या’ जंगलात माणूस होतो गायब

ट्रान्सल्वेनिया : जगात अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. काही ठिकाणे खूपच शांत आहेत, तर काही खूपच भीतीदायक. रोमानियाच्या ट्रान्सल्वेनिया प्रांतात जगातील सर्वात खतरनाक जंगल आहे. या ठिकाणी जाण्याचे धाडस कुणी करत नाही. कारण या जंगलात गेलेला माणूस परत येत नाही, असे सांगितले जाते.

होया बस्यू असे या जंगलाचे नाव आहे. या ठिकाणी घडणार्‍या विचित्र घटनांमुळे याला ट्रान्सल्वेनियाचा बर्मुडा ट्रँगल म्हटले जाते. हे जंगल 700 एकरांत पसरले आहे. जंगलातील झाडे इतकी विचित्र आहेत की, दिवसा उजेडीही ती भीतीदायक वाटतात. 1870 च्या सुमारास या जंगलाच्या शेजारच्या गावातील शेतकर्‍याची मुलगी जंगलात गायब झाली होती. पाच वर्षांनी ती आश्चर्यकारकरीत्या परतली. मात्र ती सर्व काही विसरली होती. काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. ही कथा आजही सांगितली जाते.

Back to top button