पाक म्हणतो : आम्ही दहशतवादाचे बी पेरले… | पुढारी

पाक म्हणतो : आम्ही दहशतवादाचे बी पेरले...

इस्लामाबाद, वृत्तसंस्था :  आम्ही दहशतवादाचे बी पेरले, याविरुद्ध आता सर्वांनी मिळून लढा द्यावा लागेल. तसेच आता पाकिस्तानने स्वताला सुधारावयाची वेळ आली आहे, अशी जणू कबुलीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी दिली.

पेशावरमध्ये मशिदीत झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत बोलताना ख्वाजा असिफ म्हणाले की, भारत अथवा इस्त्राईलमध्ये नमाजावेळी नमाज पठण करणाऱ्यांवर हल्ला झालेला नाही. मात्र, पाकिस्तानात नमाजींमध्ये बसलेल्यानेच आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात १०० लोकांचा मृत्यू तर २२१ जखमी झाले.
डॉनने दिलेल्या हवाल्यानुसार ख्वाजा असिफ पुढे म्हणाले की, आम्ही दहशतवादाचे बी पेरले आहे. आम्हाला आता याविरूद्ध सर्वानी एकत्र येऊन लढावे लागणार आहे. तसेच आता पाकने स्वताला सुधारावयाची वेळ आली आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) या संघटनेने स्वीकारली आहे.

Back to top button