शेकडो वर्षे एकाच लाकडी खांबावर टिकलेले मंदिर | पुढारी

शेकडो वर्षे एकाच लाकडी खांबावर टिकलेले मंदिर

बीजिंग : चीनच्या दक्षिण पश्चिमी पहाडी भागात असलेले गान्लू मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे, शेकडो वर्षे ते एकाच लाकडी खांबावर उभे आहे. हे बुद्ध मंदिर आहे. येथे जगभरातून पर्यटक येत असतात.

जमिनीपासून 260 फूट उंचीवर बांधलेले हे मंदिर 1146 सालातील आहे. झुकिया नावाच्या व्यक्तीने त्याच्या आईच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले. गान्लू या नावाचा अर्थ गोड देव असा आहे. या मंदिरात मागच्या पहाडातून वाहणार्‍या झर्‍याचे पाणी टपकत असते. पाणी चवीला अगदी दवबिंदूसारखे असून, औषधी गुणधर्मांनीयुक्त आहे, असे मानले जाते.

 

Back to top button