इराणमधील पोलिस दलच जाहीर होणार दहशतवादी! | पुढारी

इराणमधील पोलिस दलच जाहीर होणार दहशतवादी!

तेहरान: वृत्तसंस्था : व्हॅनमधून जाणाऱ्या इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉसच्या (आयआरजीसी) पोलिसांना हिजाबशिवाय दोन महिला तेहरानच्या रस्त्यावर दिसताच व्हॅन थांबवून पोलिस उतरतात… आणि एका महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करतात… इराणमधील हे ताजे दृश्य या देशातील परंपरा आणि नैतिकतेवरच सवाल उपस्थित करते. युरोपियन युनियनने (ईयू) हा व्हिडीओ हाती लागल्यानंतर आयआरजीसीलाच म्हणजे इराणमधील पोलिस दलालाच दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याचा निर्धार अधिक मजबूत केला आहे.

आयआरजीसीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यावर इराणमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. न्यायालयाची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया त्यासाठी सुरू आहे, असे युरोपियन युनियनतर्फे सोमवारी सांगण्यात आले इराणने हिजाबविरोधी आंदोलकांना फाशीवर चढविल्याबद्दल मात्र युरोपियन युनियनने इराणवर नवीन निर्बंध लादले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये हिजाब न घातल्याने महसा अमिनीचा पोलिस कोठडीतील छळादरम्यान मृत्यू झाला. नंतर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने केली जात आहेत. आता महिलांना मारहाणीचा ताजा व्हिडीओ इराणमधील महिला पत्रकार मासिह अलीनेजाद यांनी शेअर केला आहे.

Back to top button