बॉयफ्रेंडला मेसेज केले म्हणून तरुणीला 40 हजार रुपयांचा दंड! वाचा काय आहे प्रकरण… | पुढारी

बॉयफ्रेंडला मेसेज केले म्हणून तरुणीला 40 हजार रुपयांचा दंड! वाचा काय आहे प्रकरण...

लंडन; वृत्तसंस्था : प्रेमात ब्रेकअप होणे, ही एक सामान्य बाब आहे. ब्रेकअपमुळे कधी कधी सूड उगवण्याचा प्रयत्नही केला जातो. नेमकी अशीच घटना इंग्लंडमध्ये घडली. तेथील एका तरुणीने ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडला मोबाईलवर तब्बल हजार मेसेज पाठवून भंडावून सोडले. यामुळे बॉयफ्रेंडने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तरुणीला मित्रापासून १८ महिने दूर राहण्याचा आदेश देण्याबरोबरच जबर दंडही ठोठावला.

मिशैल नामक या तरुणीचा बॉयफ्रेंड रेयॉनशी ब्रेकअप झाला. रेयॉनने मिशैलशी अचानकपणे बोलणेच बंद केले. ही बाब मिशैल सहन करू शकली नाही. तिने एका पाठोपाठ एक असे तब्बल हजार मेसेज रेयॉनला पाठविले. मेसेज येतच राहिल्याने शेवटी रेयॉनने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

न्यायालयाने मिशैल व रेयॉनला बोलावून घेतले. यावेळी रेयॉनने सांगितले की, मिशेल कायम भांडण करते. एकदा तर रागात तिने माझे बोटच मोडले. यामुळेच मी मिशैलबरोबर ब्रेकअप केला. न्यायालयाने मिशैलला पाच हजार रुपयांचा दंड आणि रेयॉनला सरचार्ज म्हणून ४० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. तसेच तिला एक आठवडा सुधारगृहात राहण्यास सांगितले.

Back to top button