Brittan PM Rishi Sunak : सीट बेल्ट लावला नाही म्हणून ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांना दंड | पुढारी

Brittan PM Rishi Sunak : सीट बेल्ट लावला नाही म्हणून ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांना दंड

पुढारी ऑनलाइन डेस्क : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कारमध्ये सिटबेल्ट न बांधल्याने त्यांना दंड भरावा लागला आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कारमध्ये बसले आहे. चालत्या कारमध्ये ते व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांनी सीट बेल्ट बांधलेला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरले. त्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली.

सुनक यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवण्यासाठी आपले सीट बेल्ट काढले होते. त्यांना आपली चूक मान्य आहे. ही त्यांची चूक होती आणि यासाठी ते मनाने माफी मागत आहेत. सुनक यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, सर्वांनी सीट बेल्ट लावायला पाहिजे, असे पंतप्रधान मानतात.

का काढला होता ऋषी सुनक यांनी सीट बेल्ट?

सुनक यांनी देशभरात आपल्या 100 पेक्षा अधिक परियोजनांना निधी देण्यासाठी आपल्या सरकारने नवीन लेवलिंग अप फंडच्या घोषणांना चालना देण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. यावेळी कॅमे-याला संबोधित करताना पोलिसांच्या मोटारसायकलसह त्यांची कार व्हिडिओत दिसत आहे. यावेळी हा व्हिडिओ बनवताना सुनक यांनी थोड्या वेळासाठी आपला सीटबेल्ट काढला होता.

सुनक यांनी जेव्हा उड्डाणासाठी आरएएफ जेटचा उपयोग केला. तेव्हा विरोधकांनी या उड्डाणाबद्दल मोठा आक्षेप घेतला. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले.

दरम्यान, इंग्लमध्ये सीटबेल्ट न बांधल्यास जागेवर 100 पौंडचा दंड वसूल करण्याचा नियम आहे. जर प्रकरण न्यायालयात गेले तर दंडाची रकम 500 पाउंड पर्यंत जाते. सुनक यांनाही याप्रकरणी दंड आकारण्यात आला. दरम्यान, ऋषि सुनक यांनी आपली चूक मान्य करून माफी मागितली आहे.

हे ही वाचा :

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजक, विरोधक दोघांवर गुन्हे दाखल

Weather Update : २८ जानेवारीपासून राज्यात थंडी पुन्हा वाढणार

Back to top button