पुढारी ऑनलाइन डेस्क : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट 2023 मध्ये तब्बल 10 हजार नोक-या कमी करणार आहे. अर्थात कंपनीतील 10 हजार कर्मचा-यांच्या डोक्यावर यावर्षी टांगती तलवार असणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील कर्मचा-यांची कपात करणार आहे. मात्र, नेमक्या कोणत्या विभागातील कर्मचा-यांना नोकरी गमवावी लागेल याबाबत कोणतीही माहिती मायक्रोसॉफ्टने दिली नाही. Microsoft
मायक्रोसॉफ्ट कॉर्पने बुधवारी सांगितले की, ते आर्थिक वर्ष 2023 च्या तिस-या तिमाहीच्या अखेरीस 10 हजार नोक-या कमी करणार आहे. याबाबत बोलताना मायक्रोसॉफ्टने सांगितले की यूएस तंत्रज्ञान क्षेत्रात कंपन्या आर्थिक मंदीचा सामना करत असताना टाळेबंदीचा वेग वाढला आहे.
Microsoft मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे टाळेबंदीमुळे आर्थिक वर्ष 2023 च्या दुस-या तिमाहीत $1.2 अब्ज शुल्क आकारले जाईल. याचा नकारात्मक प्रभाव मायक्रोसॉफ्टच्या शेअरवर राहणार आहे. हा प्रभाव प्रति शेअर नफ्यावर 12 सेंट इतका असणार आहे.
दरम्यान, विश्लेषकांनी दोन दिवस पूर्वीच मायक्रोसॉफ्ट या वर्षात कर्मचा-यांची मोठी कपात करेल असा अहवाल दिला होता. मात्र, त्यावेळी मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी अफवांवर प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
मायक्रोसॉफ्ट ही संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी क्षेत्रातील उत्पादनांसाठी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. एका अहवालानुसार गेल्या वर्षीच्या 30 जूनपर्यंत कंपनीकडे 2 लाख 21 हजार पूर्ण वेळ कर्मचारी होते. यापैकी 1 लाख 22 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 99 हजार कर्मचारी कार्यरत होते.
हे ही वाचा :