घरात मृत्यू झाला की, कापतात महिलांची बोटे; मृत पावलेली व्यक्‍ती भूत होऊन छळू नये म्हणूनची परंपरा | पुढारी

घरात मृत्यू झाला की, कापतात महिलांची बोटे; मृत पावलेली व्यक्‍ती भूत होऊन छळू नये म्हणूनची परंपरा

जकार्ता : जग विचित्र आहे, असं म्हणतात ते उगीच नाही. आता इंडोनेशियातील ही भयंकर परंपरा पाहा… घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्या घरातील सर्व महिलांची बोटेच कापून टाकतात. यामागचे कारणही विचित्र आहे. दानी नावाच्या आदिवासी समाजात ही परंपरा पूर्वांपार चालत आली आहे. हा समाज पापुआ गिनी भागात आढळतो. किमान अडीच लाख लोक या समाजाचे आहेत. मृत पावलेला व्यक्ती भूत होऊन छळू नये म्हणून त्या घरातील महिलांची बोटे कापून टाकली जातात. बोटे कापण्याआधी त्याखालील भाग दोरीने करकचून बांधला जातो.

जेणेकरून रक्तप्रवाह थांबावा. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटे कापली जातात. सरकारने आदिवासी समाजाच्या या क्रूर परंपरेवर बंदी आणली आहे. मात्र, तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत; पण मृत झालेली व्यक्ती फक्त महिलांनाच छळते का? हा प्रश्न निर्माण होतो.

Back to top button