१२ देशांनी घातलेल्या निर्बंधांना चीन प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत | पुढारी

१२ देशांनी घातलेल्या निर्बंधांना चीन प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

बीजिंग; वृत्तसंस्था :  कोरोनाच्या लाटेमुळे भारत, अमेरिकेसह १२ देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातल्यामुळे चीनने संताप व्यक्त केला असून, या देशांबाबत चीनही अशीच निर्बंधांची कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाची लाट झपाट्याने वाढत असून, गेल्या महिन्यात या लाटेने कळस गाठला. त्यामुळे भारत, अमेरिका, फ्रान्स, जपानसह १२ देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.

चिनी परराष्ट्र प्रवक्त्याने १२ देशांच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करताना, असा निर्णय घेण्यामागे कसलेही शास्त्रीय कारण नसताना निर्बंध लादणे आश्चर्यजनक आहे. हा चीनच्या बाबतीत भेदभाव असून, चीनही प्रत्युतरादाखल अशा देशांच्या प्रवाशांवर निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे.

Back to top button