पुढारी ऑनलाइन डेस्क : फ्रान्सच्या वायव्य किना-यावरील जर्सीच्या चॅनेल बेटावर एका अपार्टमेंटच्या इमारतीत मोठा स्फोट झाला. यामध्ये किमान तीन लाकोंचा मृत्यू झाला असून जवळपास डझनभर लोक बेपत्ता आहेत. स्थानिक पोलिसांना 4 च्या (स्थानिक वेळेनुसार) सुमारास याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीएनएनने बेटाच्या मुख्यमंत्री क्रिस्टीना मूर यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
स्टे ऑफ जर्सीचे मुख्य पोलिस अधिकारी रॉबिन स्मिथ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आपत्कालीन सेवा पोहोचवण्यात आली. त्यांनी घटनास्थळावरील आग विझवली.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे तर अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, रहिवाशांना स्फोटाच्या आदल्या रात्री गॅसचा वात येत होता. त्यामुळे गॅस गळतीमुळे स्फोट झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
स्मिथ यांनी सांगितले की ही तीन मजली इमारत पूर्णपणे कोसळली. हे दृश्य इतके भयानक होते की त्याला विनाशकारी दृश्य असे वर्ण करता येईल. फ्लॅटमधील अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. 20 ते 30 जणांना जवळच्या टाऊन हॉलमध्ये आश्रयासाठी नेम्यात आले आहे. तर बेपत्ता लोकांचा शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा :