उत्तर कोरियात दोघा विद्यार्थ्यांना मृत्युदंड | पुढारी

उत्तर कोरियात दोघा विद्यार्थ्यांना मृत्युदंड

सेऊल :  दक्षिण कोरियात तयार झालेला चित्रपट पाहिल्याबद्दल उत्तर कोरियामध्ये माध्यमिक शाळेत शिकणार्‍या दोघा विद्यार्थ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. शत्रू देशाचा चित्रपट पाहणे हा उत्तर कोरियात गंभीर गुन्हा मानला जातो. दोन्ही विद्यार्थ्यांचे वय 15-16 वर्षांदरम्यान होते. त्यांना भरदिवसा लोकांसमोर गोळ्या घालण्यात आल्या.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात सातत्याने तणाव असतो. त्यामुळे उत्तर कोरियातील लोक दक्षिण कोरियातील शो आणि चित्रपट पाहू शकत नाहीत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष किम जोंग ऊन यांच्या अधिकार्‍यांनी हेसन शहरातील नागरिकांना एका मोकळ्या मैदानात गोळा होण्यास सांगितले. तेथे काही अधिकार्‍यांनी जमावासमोर या विद्यार्थ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांना गोळी घालून ठार मारण्यात आले.

Back to top button