Covid-19 Treatment : ४११ दिवस कोरानाशी झुंज देणारा रुग्ण झाला बरा | पुढारी

Covid-19 Treatment : ४११ दिवस कोरानाशी झुंज देणारा रुग्ण झाला बरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल ४११ दिवसांपासून कोविडने बाधित असणाऱ्या रुग्णाला बरे करण्यात ब्रिटिश संशोधकांना यश आले आहे. या बाबतची माहिती बुधवारी डॉक्टरांकडून देण्यात आली. या रुग्णाच्या विशिष्ट विषाणूच्या अनुवांशिक कोडचे विश्लेषण करुन विषाणूवरील योग्य उपचार पद्धतीचा शोध लावत या व्यक्तीचा यशस्वी इलाज करण्यात संशोधकांना यश आले. युके मधील हे एक मात्र उदाहरण आहे, ज्या मध्ये इतक्या काळापासून कोविडशी झुंज देणारा रुग्ण बरा झाला आहे.(covid-19 treatment)

कोरोना महामारीला जगात येऊन तीन वर्षे होत आहेत, पण तरीही हा विषाणू लोकांना संक्रमित करत आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा कोविडचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यूकेमध्ये कोविडचे एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे कोरोनाची लागण झालेला रुग्ण ४११ दिवसांनंतर या आजारातून बरा झाला आहे. या रुग्णाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. कोविडपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी त्याला कॉकटेल औषधे दिली होती, ज्यामुळे तो बरा झाला.

या रुग्णाला डिसेंबर 2020 मध्ये कोविडची लागण झाली होती. गाईज आणि सेंट थॉमस एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, लंडन आणि किंग्ज कॉलेज लंडनच्या तज्ञांच्या मते, 59 वर्षांचा हा रुग्ण व्हायरसच्या सुरुवातीच्या प्रकाराने संक्रमित झाला होता आणि नंतर तो कोविडमधून बरा होऊ शकला नाही. रुग्णावर उपचार करण्यासाठी, डॉक्टरांनी त्याला न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजचे (रेजेनेरॉन) कॉकटेल दिले, जे कोरोनाव्हायरसच्या सुरुवातीच्या प्रकारांविरूद्ध प्रभावी असल्याचे मानले जाते. या उपचाराने त्यांचे शरीर कोविडपासून मुक्त झाले. (covid-19 treatment)

कोविडचे अहवाल सातत्याने येत हो पॉझिटिव्ह (covid-19 treatment)

डॉक्टरांनी सांगितले की, या रुग्णामध्ये कोविडची लक्षणे संपली होती, परंतु 400 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येतच होता. जेव्हा कोविड चाचणी केली गेली तेव्हा त्यात कधीही निगेटिव्ह अहवाल आला नाही. यापूर्वी एक रुग्ण ५०५ दिवसांपासून कोविड पॉझिटिव्ह होता, पण नंतर त्याचा मृत्यू झाला.

कोविडमुळे कमकुवत झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला रुग्ण बळी पडला नाही, परंतु या 59 वर्षीय रुग्णाने कोविडशी दीर्घकाळ लढा दिला आणि शेवटी तो कोरोनामुक्त झाला. या रुग्णाची रोगप्रतिकारशक्तीही खूपच कमकुवत होती. इतके दिवस लागण राहण्याचे हेच कारण होते. पण, कॉकटेल उपचार खूप प्रभावी होते. या रुग्णाला इतक्या दिवसांपासून संसर्ग होण्याचे कारण देखील कोविडचे प्रारंभिक प्रकार असल्याचे मानले जाते.

Back to top button