अण्वस्त्र वापराचा विचार करु नका : राजनाथ सिंहांची रशियाच्‍या संरक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा | पुढारी

अण्वस्त्र वापराचा विचार करु नका : राजनाथ सिंहांची रशियाच्‍या संरक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्‍याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये युक्रेनमधील सद्‍यस्‍थितीवर चर्चा झाली. युक्रनेने ‘डर्टी बॉम्‍ब’ वापराची धमकी दिली असल्‍याची माहिती देत यावर सर्गेई यांनी चिंता व्‍यक्‍त केली, अशी माहिती रशियाच्‍या दुतावासाच्‍या सूत्रांनी दिली.

अण्वस्त्र वापराचा विचार करु नका : राजनाथ सिंहांचे आवाहन

युक्रेनमधील संघर्षावर दोन्‍ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा. कोणत्‍याही परिस्‍थितीत अण्‍वस्‍त्राच्या वापराचा विचार करु नका. अण्‍वस्‍त्राचा वापर हा मानवतेच्‍या मुलभूत सिद्धांताविरोधात आहे, असे स्‍पष्‍ट करत दोन्‍ही देशांमधील संघर्षावर लवकरात लवकर तोडगा काढण्‍यात यावा, अशी अपेक्षाही राजनाथ सिंह यांनी व्‍यक्‍त केली.

दरम्‍यान, दोन आठवड्यांपूर्वी रशियाने क्रीमियामध्‍ये झालेल्‍या स्‍फोटानंतर रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्‍त्र डागण्‍यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्‍ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळला आहे. क्रीमिया येथे झालेल्‍या स्‍फोटाला यूक्रेनच जबाबदारअसल्‍याचा दावा रशियाने केला आहे.

 

Back to top button