Jinping : शी जिनपिंगच चीनचे सर्वेसर्वा, तिसर्‍यांदा राष्‍ट्राध्‍यक्षपदी निवड

Jinping : शी जिनपिंगच चीनचे सर्वेसर्वा, तिसर्‍यांदा राष्‍ट्राध्‍यक्षपदी निवड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील कम्‍युनिस्‍ट पार्टीच्‍या २० व्‍या अधिवेशनाच्‍या समारोपानंतर पुन्‍हा एकदा राष्‍ट्राध्‍यक्ष म्‍हणून शी जिनपिंग यांची निवड झाली आहे. ते सलग तिसर्‍यांना कम्‍युनिस्‍ट पार्टीचे महासचिव बनले आहे. चीनमध्‍ये या पदावरील नेता हा राष्‍ट्राध्‍यक्ष आणि पीपुल्‍स लिबरेशन आर्मीचा कमांडरही असतो.

सत्ता अबाधित ठेवण्‍यासाठी Jinping यांनी बदलला नियम

चीनमधील कम्‍युनिस्‍ट पार्टीच्‍या सर्वेसर्वा म्‍हणून तिसर्‍या शी जिनपिंग यांची निवड झाली. यामुळे तीन दशकांपूर्वीचा नियमही मोडला गेला आहे. चीनमध्‍ये १९८० नंतर देशाच्‍या सर्वोच्‍च पदी असणारी व्‍यक्‍ती सलग १० वर्ष राहिल असा नियम करण्‍यात आला होता. 2012 मध्ये जिनपिंग सत्तेवर आले. जिनपिंग यांच्या आधी राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या सर्व नेत्यांना पाच वर्षांच्या दोन टर्मसाठी किंवा वयाच्या 68व्या वर्षी निवृत्त व्हावे लागले. 2018 मध्ये चीनने अध्यक्षपदासाठी दोन टर्मची मर्यादा रद्द केली. जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. जिनपिंग यांच्या विरोधात वक्तव्य करणेही 2021 मध्ये गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत आले आहे.

2023 मध्ये जिनपिंग यांचा दुसरा कार्यकाळ संपत होती; पण चीनमध्ये केवळ कमाल दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची अटच काढलेली नाही,तर जिनपिंग यांची दुसर्‍यांदा पक्षप्रमुख म्हणूनही निवड झालेली आहे. जिनपिंग यांचे विचार चीनच्या राज्यघटनेचा भाग बनले आहेत.

माजी राष्‍ट्राध्‍यक्षांची हकालपट्‍टी, चौघा उच्चपदस्थ अधिकार्‍यांची उचलबांगडी

माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ, विद्यमान पंतप्रधान तसेच राष्ट्राध्यक्ष पदाचे इच्छुक ली केक्यांग तसेच तीन अन्य उच्चपदस्थ अधिकार्‍यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत अपमानजनक पद्धतीने शनिवारी बाजूला केले. जिनपिंग यांनी ली केक्यांग यांच्यासह चौघा उच्चपदस्थ अधिकार्‍यांना पदावरून पायउतार केले; पण माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा तर घोर अपमान केला. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत कडवट ठरला.

उठा आणि बाहेर व्हा : माजी राष्‍ट्राध्‍यक्षांना केले अपमानित

हू जिंताओ हे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या शेजारील खुर्चीवर बसलेले होते आणि दोन गार्डस् आले. त्यांनी जिंताओ यांना खुर्चीवरून बळजबरीने उठविले आणि 'ग्रेट हॉल ऑफ दी पीपल'बाहेर काढले. दोन्ही गार्ड आले, 'उठा आणि बाहेर व्हा' म्हणाले, जिंताओ चकितझाले. त्यांनी एक कटाक्ष जिनपिंग यांच्याकडे टाकला. जिनपिंग गालातल्या गालात हसत होते. जिंताओ उठत नव्हते. मग एका गार्डने त्यांच्या बगलेत हात घातला. आपण बाहेर पडलो नाही तर आपल्याला उचलून बाहेर काढले जाईल, हे दोन्ही गार्ड आणि जिनपिंग यांच्या देहबोलीवरून जिंताओंच्या लक्षात आले. ते उठताना जिनपिंग यांना उद्देशून काहीतरी म्हणाले, जिनपिंग यांनी त्यांच्याकडे पाहून एक विजयी हास्य तेवढे दिले. गार्डस्नी जिंताओंना बाहेर काढले. अधिवेशनात सहभागी असलेल्या दोन हजारांवर पदाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर जणू काहीच घडले नाही, असे भाव होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news