कठोर निर्णय घेत भारताचा रशियाला धक्का, UN मध्ये पुतिन यांच्या मागणीच्या विरोधात मतदान | पुढारी

कठोर निर्णय घेत भारताचा रशियाला धक्का, UN मध्ये पुतिन यांच्या मागणीच्या विरोधात मतदान

पुढारी ऑनलाईन: युक्रेन संकट प्रकरणी भारताने रशियाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. गुप्त मतदानाची पुतीन यांची मागणी भारताने फेटाळून लावली. युक्रेनच्या चार प्रदेशांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याबद्दल रशियाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मसुदा ठराव आणण्यात आला. या ठरावात रशियाचा निषेध करण्यासाठी खुल्या मतदानाची मागणी केली होती, परंतु पुतीन यांना त्यावर गुप्त मतदान हवे होते. आता पुतीन यांच्या या मागणीच्या विरोधात भारताने UN मध्ये मतदान केले आहे.

भारतासह 107 देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केले

गुप्त मतदानाची रशियाची मागणी भारतासह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 107 सदस्य राष्ट्रांनी रेकॉर्ड केलेल्या मतदानाच्या बाजूने दिल्यानंतर फेटाळण्यात आली. गुप्त मतदानासाठी रशियाच्या आवाहनाच्या बाजूने केवळ 13 देशांनी मतदान केले, तर 39 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. मतदान न करणाऱ्या देशांमध्ये रशिया आणि चीनचा समावेश होता.

रशियन प्रतिनिधीने महासभेच्या अध्यक्षांबद्दल केले प्रश्न उपस्थित

भारतासह 104 देशांनी अशा फेरविचाराच्या विरोधात मतदान केल्यानंतर सर्वसाधारण सभेने ठरावावर फेरविचार न करण्याचा निर्णय घेतला. रशियाचे स्थायी प्रतिनिधी व्हॅसिली नेबेन्झिया म्हणाले की, ”यूएन सदस्य एक अपमानजनक फसवणूकीचे साक्षीदार बनले आहेत. ज्यामध्ये दुर्दैवाने महासभेच्या अध्यक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली.”

व्हॅसिली नेबेन्झिया पुढे म्हणाले, “हे एक अभूतपूर्व फेरफार आहे. ज्यामुळे महासभा आणि संपूर्ण संयुक्त राष्ट्रांचे अधिकार कमी होतात. अर्थात, अशा परिस्थितीत आम्ही मतदानात भाग न घेणे निवडले.”

भारताने गेल्या महिन्यात केले नाही मतदान

गेल्या महिन्यात, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अल्बेनियाने मांडलेल्या ठरावाच्या मसुद्यावर मतदान करण्यापासून दूर स्वतःला दूर ठेवले. मॉस्कोच्या “बेकायदेशीर सार्वमताचा” निषेध करण्यासाठी अमेरिका आणि अल्बेनियाने मांडलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर रशियाने व्हेटो केला.

Back to top button