Mexico Shooting : मेक्सिकोमध्ये माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, महापौरासह 12 ठार | पुढारी

Mexico Shooting : मेक्सिकोमध्ये माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, महापौरासह 12 ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो येथील इरापुआटोमधील एका बारमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सहा पुरुष आणि सहा महिलांसह बारा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. संशयित आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आले असून तो लवकरच पकडला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण-पश्चिम मेक्सिकोमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये 18 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएनओ न्यूजने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गुरेरो राज्याच्या सिटी हॉलमध्ये बंदुकधा-याने गोळीबार केला. यामध्ये महापौरांसह 12 जणांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की हल्लेखोराने अनेक गोळ्या झाडल्या. त्यामुळे लोक पळून जाण्यासाठी इकडे-तिकडे धावत होते.

20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

या घटनेबाबत मेक्सिकन पत्रकार जेकब मोरालेस यांनीही ट्विट केले आहे. ते म्हणाले की, या हल्ल्यात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

Back to top button