Abdul Latif Rashid : अब्दुल लतीफ रशीद बनले इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष; नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा

Abdul Latif Rashid : अब्दुल लतीफ रशीद बनले इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष; नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा

पुढारी ऑनलाईन डेस्क: कुर्दीश राजकीय नेते अब्दुल लतीफ रशीद (Abdul Latif Rashid) यांची इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. इराकमध्ये गेले वर्षभर नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा चर्चेत होता. चार वर्षे इराकचे राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या बरहम सालीह यांची जागा राशिद यांनी घेतली आहे. या निवडीमुळे आता नवीन सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

७८ वर्षीय अब्दुल लतीफ रशीद यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. २००३ ते २०१० इराकचे जलसंपदा मंत्री अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली आहे. लतीफ यांना अध्यक्षपदाच्या निवडणूकीत २६१ मतांपैकी १६२ मते मिळाली. माजी अध्यक्ष बरहम सालेह यांचा या निवडणूकीत ९९ मतांनी पराभव पत्करावा लागला. लतीफ यांचा जलसंपदा मंत्रीपदापासून सुरू झालेला राजकीय प्रवास हा उल्लेखनीय कार्य केलेला आहे. राज्याच्या प्रमुखांचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे.

इराकमधील कायद्यानुसार, पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित व्यक्तीला मतदान करण्यापूर्वी खासदारांनी राष्ट्राध्यक्षांची निवड करणे आवश्यक असते. त्यामुळे रशीद हे आता नव्या सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमी यांच्या जागी आता नवे सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान पदाची नियुक्त करणे हे त्यांचे प्रथम कार्य असेल. ऑक्टोबर २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वर्षभराची निर्माण झालेली राजकीय पोकळी आता लकरच भरून निघणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news