युक्रेनने ‘नाटो’मध्‍ये प्रवेश केल्‍याने तिसरे महायुद्ध अटळ : रशियाचा इशारा

युक्रेनने ‘नाटो’मध्‍ये प्रवेश केल्‍याने तिसरे महायुद्ध अटळ : रशियाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ( नाटो ) या संघटनेत युक्रेनने प्रवेश केल्‍याने आता तिसरे महायुद्ध अटळ आहे, असा इशारा नाटोमध्‍ये रशियन फेडरेशनच्‍या सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी आज (दि.१३) रशियातील TASS या वृत्तसंस्थेला दिलेल्‍या मुलाखतीवेळी व्‍यक्‍त केला.

यावेळी वेनेडिक्टोव्ह म्हणाले, "नाटोमध्‍ये प्रवेश करणे म्‍हणजे तिसर्‍या महायुद्धाला चालना देण्‍यासारखेच आहे, याची जाणीव युक्रेनला आहे. मात्र या देशाने स्‍वत:कडे लक्ष वेधण्‍यासाठी ही धडपड सुरु केली आहे. युरोपातील देशांनी युक्रेनला मदत करुन ते संघर्षाला खपताणी घालत आहेत.

रशियाने गुरुवारी पहाटे स्फोटक ड्रोनचा वापर करून युक्रेनची राजधानी कीव्‍हमधील एका वस्तीला लक्ष्य केले आहे. तसेच क्षेपणास्त्रांनी मायकोलायव्ह शहरावर हल्ला केला. हे क्षेपणास्‍त्र निवासी इमारतीवर डागले गेले. या इमारतीचे दोन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, अशी माहिती मायकोलायव्हचे महापौर सेनकेविच यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून देल्‍याचे वृत्त रॉयर्टस या वृत्तसंस्‍थेने दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news