

पुढारी ऑनलाईन – अत्यंत दुर्मिळ अशा ११.५ कॅरटच्या गुलाबी हिऱ्याची तब्बल ५८ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीला विक्री झाली आहे. भारतीय चलनात ही किंमत तब्बल ४00 कोटी रुपये इतकी होते. या हिऱ्याचे नाव विल्यम्सन पिंक स्टार असे आहे.
फ्लोरिडा येथील एका व्यक्तीने या हिऱ्याची खरेदी केली आहे. या हिऱ्याला २१ दशलक्ष डॉलर इतकी किंमत मिळणे अपेक्षित होते, पण अपेक्षेपेक्षा दुप्पट रक्कम मिळाली आहे. (williamson pink star diamond)
आतापर्यंत लिलाव झालेल्या हिऱ्यांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा महाग हिरा ठरला आहे. गुलाबी रंगाचा हिरा हा जगातील सर्वांत दुर्मिळ हिरा मानला जातो. अशा हिऱ्यांना जगात सर्वांत जास्त मागणी असते. यापूर्वी २०१७मध्ये सीटीएफ पिंक स्टार या गुलाबी हिऱ्याची विक्री तब्बल ७१.२ दशलक्ष डॉलरला झाली होती.
विल्यमसन पिंक स्टार हे नाव दोन हिऱ्यांपासून दिले गेले आहे. CTF पिंक स्टार आणि विल्यमसन स्टोन या दोन हिऱ्यांच्या नावापासून विल्यमसन पिंक स्टार हे नाव दिले गेले आहे. विल्यमसन स्टोन हा हिरा राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांना १९४७ला त्यांच्या लग्नात भेट देण्यात आला होता. विल्यमसन स्टोर हा हिरा २३.६ कॅरेटचा आहे.
हेही वाचा