शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर : Alt Newsचे संस्थापक जुबेर, सिन्हा टाईमच्या फेव्हरिट यादीत | पुढारी

शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर : Alt Newsचे संस्थापक जुबेर, सिन्हा टाईमच्या फेव्हरिट यादीत

शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर

नवी दिल्ली – शांततेसाठी दिला जाणार नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर होणार आहे. या पुरस्कारासाठी राजकीय नेत्यांबरोबर २ भारतीय पत्रकार आघाडीवर आहेत. Alt Newsचे संस्थापक मोहंमद जुबेर आणि प्रतीक सिन्हा अशी या पत्रकारांची नावे आहे. फेक न्यूज आणि चुकीची माहितीविरोधात Alt News काम करते.

जगप्रसिद्ध ‘टाईम’ या नियतकालिकाने ही बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूज, चुकीची माहिती, द्वेषपूर्ण भाषणे या विरोधातील त्यांचे काम लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळू शकतो, असे टाईम मासिकाने म्हटलं आहे.

मोहम्मद जुबेर यांना काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. ४ वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्विटवरून त्यांना अटक झाली होती. त्यांच्यावर जातीय तणाव पसरवण्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेचा जगभरातील पत्रकारांनी निषेध केला होता. Editors Guild of Indiaने “चुकीची माहिती हे ज्यांच्यासाठी शस्त्र आहे, ते Alt Newsमुळे संतप्त झाले आहेत,” अशी कडवी टीका केली होती.  Committee to Protect Journalists या संस्थेने जुबेर यांची अटक भारतातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याला धक्का असल्याचे म्हटले होते.
जुबेर यांना सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै राेजी जामीन मंजूर केला होता.

टाईम नियतकालिकाने दिलेल्या दिग्गज व्यक्ती आणि संघटनांच्या यादीत बेलारुस देशाचे विरोधी पक्ष नेत्या सैवतलाना शिकानोउसकाया, ब्रिटनमधील पर्यावरणवादी डेव्हिड ॲटनब्रो, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी जागतिक आरोग्य संघटना, ग्रेट थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सिमॉन कोफ, म्यानमार नॅशलन युनिट गव्हर्मेंट यांचा समावेश आहे.

हेही वाचा

 

 

Back to top button