Rupee slips further : काल सावरल्यानंतर आज रुपयाची पुन्हा घसरण, गाठली सार्वकालिक नीचांकी पातळी | पुढारी

Rupee slips further : काल सावरल्यानंतर आज रुपयाची पुन्हा घसरण, गाठली सार्वकालिक नीचांकी पातळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आज पुन्हा घसरला Rupee slips further. रुपयाची ही घसरण गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू आहे. आज सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 40 पैशांनी घसरून 81.93 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला आहे.

Rupee slips further बुधवारी सकाळी मार्केट सुरू झाल्यानंतर बाजारात रुपयाची घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 40 पैशांनी घसरून 81.93 इतकी नीचांकी पातळी गाठली आहे. सातत्याने रुपयाची घसरण होत असताना काल मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २२ पैशांनी वाढून ८१.४५ वर पोहोचला. होता. त्यामुळे रुपया वधारण्याची आशा होती. तत्पूर्वी सोमवारी (दि. 26) तारखेला डॉलरच्या तुलनेत रुपया 56 पैशांनी घसरून 81.54 रुपये इतकी कमी झाली होती.

Rupee slips further सुरूवातीला अमेरिकन चलनाच्या मजबूती आणि स्थानिक बाजारात रुपयाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेली जोखीमीची भावना यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला आहे.

Rupee slips further रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे भू-राजकीय जोखीम वाढणे, देशांतर्गत असमानतेच्या भावनेमुळे निर्माण झालेला नकारात्मक कल आणि लक्षणीय परदेशी निधी बाहेर पडणे यामुळे गुंतवणूकदारांची भूक कमी झाली, असे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांचे मत आहे. जगभरातील आंतरबँकीय परकीय चलनात, प्रथम ग्रीनबँकच्या तुलनेत रुपयाने 81.47 इतक्या किंमतीने सुरूवात केली, नंतर त्यापूर्वीच्या बंदच्या तुलनेत 43 पैशांनी घसरून तो 81.54 वर आला. शुक्रवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (Rupee slips further) रुपया 30 पैशांनी घसरून 81.09 च्या नीचांकी पातळीवर येऊन थांबला होता.

Share Market Today | शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स, निफ्टीच्या तेजीच्या दिशेने

Stock Market Crash |’ब्लडबाथ’! सेन्सेक्सची दाणादाण, अवघ्या काही मिनिटांत ४ लाख कोटींचा चुराडा

Back to top button