Road Accident south africa : भीषण अपघात! दक्षिण आफ्रिकेत 19 शाळकरी मुलांसह 21 लोकांचा मृत्यू | पुढारी

Road Accident south africa : भीषण अपघात! दक्षिण आफ्रिकेत 19 शाळकरी मुलांसह 21 लोकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील क्वाजुलु-नताल या शहरात इस्वाटिनीच्या सीमेजवळ असलेल्या पोंगोला परिसरात भीषण अपघात झाला. 16 सप्टेंबर रोजी दुपारी एक ट्रक ओवरेटक करण्याचा प्रयत्नात असताना बसला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 19 शाळकरी मुलांसह जवळपास 21 लोकांचा मृत्यू झाला. (Road Accident south africa)

डरबनच्या उत्तरेस सुमारे 300 किलोमीटर अंतरावर दक्षिण आफ्रिकन महामार्गावर मिनीबस ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात 19 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये 12 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा समावेश होता.

 क्वाजुलु-नतालचे परिवहन मंत्री सिफो हलोमुका यांनी दिलेल्या माहितीनूसार ”या घटनेने शहरातील सर्व लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडतात असे सांगितले जात आहे. या अपघाताची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा

Back to top button