कोरोना महामारीचा अंत जवळ आला | पुढारी

कोरोना महामारीचा अंत जवळ आला

जीनिव्हा ; वृत्तसंस्था : गेल्या तब्बल तीन वर्षांपासून संपूर्ण जगाला विळखा घालणार्‍या कोरोना महामारीचा अंत आता जवळ आल्याचे आशादायक प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी केले आहे. विशेष म्हणजे, जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत चालली असून, हे सुचिन्ह असल्याचेही घेब्रेयसस यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे.

ते म्हणाले, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. शिवाय, कोरोनावर लसही उपलब्ध झाली आहे. जगातील बहुतांश देशांनी लसीकरणासाठी जोरदार मोहिमा हाती घेतल्या. कोरोना महामारीच्या निमित्ताने स्वच्छतेचे महत्त्वदेखील अधोरेखित झाले.

एवढ्यात जल्लोष नको

सध्या जी परिस्थिती समोर दिसत आहे, त्यावरून आपण हे मतप्रदर्शन करत आहोत, याचा विसर कोणालाही पडू नये. कारण, अजूनही आपल्याला कोरोनाचे शंभर टक्के निमूर्लन करण्यासाठी कमालीची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे केवळ जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संपुष्टात येत असल्याचे विधान केले म्हणून लगेच जल्लोष करणे चुकीचे ठरेल, असा निर्वाणीचा इशाराही डॉ. घेब्रेयसस यांनी दिला आहे.

Back to top button