Artificial sweeteners : कृत्रिम स्वीटनर्स वाढवू शकते हृदयविकाराचा धोका? मग याचे सेवन करावे की नको? जाणून घ्या | पुढारी

Artificial sweeteners : कृत्रिम स्वीटनर्स वाढवू शकते हृदयविकाराचा धोका? मग याचे सेवन करावे की नको? जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन : ज्यांना सकाळी चहामध्ये अधिक किंवा वरून कृत्रिम स्वीटनर (Artificial sweeteners) घेण्याची सवय आहे. त्यांनी आपली शुगर लेव्हल चेक करून, आपण सुरक्षित आहोत का? हे नक्की जाणून घ्यावे. कारण हे तुमच्या हृदयविकाराचा धोका अधिक वाढवू शकते. एका नवीन अभ्यासामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, वाढत्या हृदयरोगामध्ये कृत्रिम स्वीटनर हा संभाव्य दुवा आहे. त्यामुळे या अभ्यासातून स्पष्ट होते की, खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांनी साखरेऐवजी कृत्रिम साखर म्हणजेच कृत्रिम स्वीटनरचा वापर करणे, हे मानवी शरीरासाठी निरोगी आणि सुरक्षित पर्याय नसल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

The BJM मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात फ्रान्समधील १ लाखांहून अधित वयोवृद्ध व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले. सॉर्बोन पॅरिस नॉर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ञांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये पेय, टेबल टॉप स्वीटनर्स आणि दुग्धजन्य पदार्थांसह सर्व आहारातील गोड पदार्थांचे (Artificial sweeteners)  सेवन करणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला. तेव्हा या अभ्यासात असे आढळून आले की, गोड पदार्थांचे सेवन करणाऱ्या या व्यक्तींमध्ये हृदय किंवा रक्ताभिसरण या आजारांची जोखीम सर्वाधिक आढळली. या अभ्यासात सहभागी झालेल्यांचे वय हे सरासरी वय हे 42 होते, तर पाच पुरूषांमध्ये चार महिला होत्या.

या संदर्भातील सलग नऊ वर्षे संशोधन आणि पाठपुरावा केल्यानंतर काही महत्त्वाच्या नोंदी करण्यात आले आहे. या संशोधना दरम्यान व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, क्षणिक इस्केमिक अटॅक आणि एनजाइना यासह 1,502 हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांची नोंद झाली आहे. कृत्रिम स्वीटनरचे सेवन करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका हा ९ टक्क्यांनी जास्त असतो. तर याच कृत्रिम स्वीटनरमुळे सेरेब्रोव्हस्कुलर या रोगाचा धोकाही १७ टक्क्यांनी वाढतो. फ्रेंचमधील प्रौढांमध्ये कृत्रिम गोड पदार्थाचे (Artificial sweeteners)  सर्वाधिक सेवन केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीची जोखीम वाढली आहे.

आजकाल लोकांचे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. साखरेला पर्याय म्हणून अनेक खाद्य पदार्थ आणि शितपोयांमध्ये कृत्रिम साखरेचा वापर केला जातो. पण अनेक आरोग्य संस्थांच्यामते, नैसर्गिक साखरेला कृत्रिम साखर हा निरोगी आणि सुरक्षित पर्याय असू शकत नाहीत.

कृत्रिम स्वीटनरचा रक्तवाहिन्यांच्या स्तरांनाही धोका

या अभ्यासावर भारतातील काही तज्ज्ञांनीही काही मते व्यक्त केली आहत. भारतीय कार्डिओलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांच्या मतानुसार, कृत्रिम खाद्य पदार्थ (Artificial sweeteners) हे आरोग्यासाठी घातक ठरले आहेत. अन्न पदार्थांचे लाईफ वाढविण्यासाठी कृत्रिम साखरेचा वापर केला जातो, पण यामुळे ट्रान्स फॅटचा धोका वाढतो, पण आता हे माणसाचे आयुष्य देखील कमी करत आहे. कृत्रिम स्वीटनर्समुळे रक्तवाहिन्यांच्या स्तरांना, शरिरातील नलिकांच्या भोवतालच्या आवरणाला धोका पोहचू शकते. लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह टाळण्यासाठी गोड पदार्थांसोबतच शुद्ध साखरेचा वापर कमी करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.यावर सातत्याने संशोधन करत त्यावर पुष्टी केल्यास या प्रश्नावर यंत्रणा उभी राहण्यास मदत होऊ शकेल असेही मत डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी या अभ्यासावर मांडले आहे.

Back to top button