पाकिस्तानातील जोरदार पावसामुळे मोहेंजोदडोचे मोठे नुकसान

पाकिस्तानातील जोरदार पावसामुळे मोहेंजोदडोचे मोठे नुकसान

इस्लामाबाद – पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या तुफानी पावसामुळे मोहेंजोदडोचे (mohenjo daro) मोठे नुकसान झालेले आहे. पाकिस्तानच्या पुरातत्व विभागाने ही माहिती दिली आहे. मोहेंजोदडो ही सिंधू संस्कृतीतील सर्वांत मोठी आणि अत्यंत महत्त्वाची जागा आहे. युनेस्कोने या साईटला जागतिक वारसा स्थळाचा दर्जाही दिलेला आहे. 16 ते 26 ऑगस्ट या कालवधित या परिसरात 779.5 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.

या पावसामुळे मोहेंजोदडोचे मोठे नुकसान झाले असून येथील भिंती ढासळू लागल्या आहेत. मोहेंजोदडो येथे असलेल्या स्तुपातचा जो घुमट आहे, तेथील ही भिंत पडलेली आहे. याशिवाय येथील डी. के. एरिया, स्नानाची जागा यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या परिसरात पुराचे पाणी आले नव्हेत, पण जोरदार पावसामुळे मोहेंजोदडोचे मोठे नुकसान झाले असल्याचे इशान अली अब्बासी यांनी म्हटले आहे. अब्बासी हे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत.  सध्या येथे पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news