इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त! | पुढारी

इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त!

लंडन ; वृत्तसंस्था : ब्रिटनचे हृदय असलेल्या आणि जगभरातील श्रीमंतांचे आवडते शहर असलेल्या लंडनमध्ये सर्वाधिक मालमत्ता कोणाची, या प्रश्‍नाचे उत्तर भारतीयांची असे आहे. मालमत्तेच्या बाबतीत स्थानिक इंग्लिश नागरिकांपेक्षा भारतीय पुढे आहेत, हे तथ्य नुकतेच उजेडात आले आहे. लंडनमधील एक प्रमुख विकसक कंपनी ‘बॅरट लंडन’ने ही माहिती दिली.

कित्येक पिढ्यांपासून भारतातून स्थलांतरित झालेले नागरिक, अनिवासी भारतीय, इतरत्र राहणारे भारतीय गुंतवणूकदार, शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय यांनी लंडनमध्ये सर्वाधिक मालमत्ता घेऊन ठेवली आहे. भारतानंतर या बाबतीत ब्रिटिश आणि पाकिस्तानी नागरिक पुढे आहेत.

हे भारतीय एक, दोन किंवा तीन बेडरूमच्या आपल्या सदनिका 2 लाख 90 हजार ते 4 लाख 50 हजार पाऊंडना विकण्यास तयार आहेत.

Back to top button