वर्ण आणि वंश भेदावरून भारतीयांवर हल्ले सुरूच, अमेरिकेनंतर पोलंडमध्ये हल्ला! | पुढारी

वर्ण आणि वंश भेदावरून भारतीयांवर हल्ले सुरूच, अमेरिकेनंतर पोलंडमध्ये हल्ला!

पुढारी ऑनलाइन डेस्क : युनायटेड स्टेट्समध्ये भारतीयांना वंशभेदावरून लक्ष्य केल्याच्या एका पाठोपाठ एक घटनेनंतर, आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. परंतु यावेळी हा व्हिडिओ एका युरोपियन देशातून आला आहे. जिथे एका भारतीय व्यक्तीला कथितपणे “परजीवी” आणि “नरसंहार” असे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अनडेड क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये एक भारतीय माणूस दिसत आहे, ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही. क्लिप मध्ये एका हल्लेखोराने या भारतीय व्यक्तिला लक्ष्य केले आहे. या व्यक्तिने स्वत: ला अमेरिकन म्हणवून घेत भारतीय व्यक्ती मागे तो वांशिक वर्णांची ओरड करत आहे.

पोलंडमधील युद्ध स्मारकास संभाजीराजेंनी केले अभिवादन

ही ताजी घटना कथितपणे पोलंडमध्ये घडली असून युरोपीय देशात एका अमेरिकन माणसाकडून हा हल्ला करण्यात आला आहे. व्हिडिओतील हल्लेखोराने त्याची ओळख अमेरिकन आणि “गोरा” अशी केली आहे.

शिवाय, व्हिडिओमध्ये, तो माणूस “माझे चित्रीकरण थांबवा” असे म्हणताना ऐकले जाऊ शकते, परंतु हल्लेखोराने सांगितले की तो त्याचा देश असल्याने त्याला त्याचे चित्रीकरण करण्याचा अधिकार आहे.

“तू पोलंडमध्ये का आहेस?” व्हिडिओमध्ये हल्लेखोर ऐकू येतो. “तू माझे चित्रीकरण का करत आहेस?” तो माणूस भारतीय असल्याचे समजले. “कारण मी अमेरिकेचा आहे… आणि अमेरिकेत, तुम्ही खूप लोक आहात. मग तुम्ही पोलंडमध्ये का आहात?” हल्लेखोर पुढे म्हणाला.

संभाजीराजे छत्रपतींना पोलंड सरकारकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

तो विचारत राहिला: “तुम्हाला असे वाटते का की तुम्ही पोलंडवर आक्रमण करू शकता? तुमचा स्वतःचा देश आहे. तुम्ही तुमच्या देशात परत कसे जात नाही?” भारतीयाने त्याला टाळले आणि चालत राहिला.

“युरोपियन लोकांना जाणून घ्यायचे आहे की तुम्ही आमच्या कष्टाचे पैसे काढण्यासाठी गोर्‍या माणसांच्या भूमीवर का येत आहात. तुम्ही स्वतःचा देश का बनवत नाही? तुम्ही परजीवी का बनत आहात? तुम्ही आमच्या वंशाचा नरसंहार करत आहात. तुम्ही आक्रमक आहात. जा घरी, आक्रमणकर्ता. आम्हाला तू युरोपमध्ये नको आहे. पोलंड फक्त पोलिशसाठी आहे. तू पोलिश नाहीस,” असे ती व्यक्ती या व्हिडिओत म्हणत आहे.

अलीकडील काळातील ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे ही एका आठवड्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी अमेरिकेत अशाच प्रकारे वंशवादावरून दोन वेळा भारतीयांवर हल्ले झाले आहे. पोलंडमध्ये एका अमेरिकन माणसाकडून भारतीयावर होणारा अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब आहे.

…याच पोलंडच्या नागरिकांना दिला होता भारतीयांनी आश्रय

ज्या वेळी संपूर्ण जगाने पोलंडला नाकारलं होतं त्यावेळी भारतातील कोल्हापूर आणि जामनगर संस्थानाने पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला. हिटलरच्या छळाला कंटाळून पोलंडचे नागरिक आश्रय शोधत होते. त्या वेळी केवळ कोल्हापूर आणि जामनगर संस्थानांनी यांना आश्रय दिला. 1943 ते 1948 दरम्यान कोल्हापूरच्या वळीवडे या ठिकाणी शहाजी महाराज यांनी पोलंडच्या नागरिकांसाठी वसाहत उभी केली.

तर दुसरी कडे असेच 500 महिला आणि 200 महिलांना घेऊन निघालेले पोलंडचे जहाज त्यावेळी शरण मागण्यासाठी दुस-या राष्ट्रात निघाले होते. त्यांनी इराणमध्ये सर्वात पहिले शरण मागितली. मात्र ती त्यांना मिळाली नाही. अशाच प्रकारे किनारपट्टीच्या अनेक देशांत या लोकांनी शरण मागितली. मात्र, हिटलरच्या भीतीने त्यांना कोणाचीही शरण मिळाली नाही. हे जहाज त्यावेळच्या गुजरातच्या किनारी भागात असलेल्या राज्यामध्ये येऊन थांबले. जामनगरच्या राजांना ही गोष्ट कळाली. त्यांनी त्या सर्वांना शरण देऊन त्यांची व्यवस्था केली. पुढे नऊ वर्षे ते जामनगर येथेच राहिले.

त्याच पोलंडमध्ये आज भारतीय लोकांवर वर्ण आणि वंशभेदावरून हल्ला होणे हे अत्यंत गंभीर आहे.

Back to top button