NASA : नासाची आर्टेमिस १ ही चंद्र-मंगळ मोहीम होणार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात

NASA : नासाची आर्टेमिस १ ही चंद्र-मंगळ मोहीम होणार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासा सोमवारी आपल्या आर्टेमिस-1 मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी सज्ज होती. पण प्रक्षेपणाच्या काही तास आधी समोर आलेल्या तांत्रिक बिघाडांमुळे त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. नासाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. हे मिशन फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधून टेक ऑफ करणार होते, ज्या अंतर्गत स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट आणि ओरियन कॅप्सूल 42 दिवसांच्या मोहिमेसाठी चंद्राच्या जवळ पाठवले जाणार होते. या क्रूड मिशन अंतर्गत SLS चे हे पहिले उड्डाण होते. आतापर्यंतचे हे सर्वात शक्तिशाली रॉकेट असल्याचे बोलले जाते. नासासाठी हे मिशन महत्त्वाचे आहे कारण आर्टेमिसच्या माध्यमातून ५० वर्षांनंतर मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.

इंधन गळती आणि इंजिनमध्ये बिघाड या तांत्रिक समस्यांमुळे नासाने आर्टेमिस-1 चे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. प्रक्षेपण पुढे ढकलल्याबद्दल नासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आर्टेमिस-1 आज प्रक्षेपित होणार नाही कारण तांत्रिक बिघाड उघकीस आला आहे. इंजिनमधील बिघाडावर काम करत सुरू आहे. आमची टीम डेटा संकलित करणे सुरू ठेवतील आणि तुम्हाला पुढील लाँच बाबत अपडेट केले जाईल.'

नासाच्या या मानवरहित मोहीमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या मोहिमेअंतर्गत अवकाशयान प्रथम चंद्रावर जाणार असून त्यानंतर मंगळ ग्रहावर जाईल. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासहित हजारो लोक हे लॉन्चिंग पाहण्यासाठी अमेरिकेच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरयामध्ये जमले होते.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news