जगातील पहिलीच केस: एका व्यक्तीला कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्हीची एकत्र लागण; कारण, अनेक पुरुषांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध | पुढारी

जगातील पहिलीच केस: एका व्यक्तीला कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्हीची एकत्र लागण; कारण, अनेक पुरुषांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध

पुढारी ऑनलाईन: इटलीमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला एचआयव्ही कोरोना आणि मंकीपॉक्सची एकत्र लागण झाली आहे. कटेनिया विद्यापीठातील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील पहिले प्रकरण आहे. या संबंधित व्यक्तीला या वर्षाच्या सुरूवातीलाच या तिन्ही आजारांची लागण झाली होती. त्या वेळी हा व्यक्ती स्पेनच्या दौऱ्यावर होती. या दौऱ्यात त्यांनी अनेक पुरुषांशी असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती पुढे आली आहे.

द सनच्या वृत्तानुसार 16 ते 20 जूनपर्यंत हा रुग्ण स्पेनच्या दौऱ्यावर होता. जर्नल ऑफ इन्फेक्शनच्या रिपोर्टच्या मते, ताप, डोकेदुखी, घशात खवखव सारखी लक्षणे दिसून आल्यानंतर पुढील 3 दिवसांनी त्याला कोरोना झाल्याचे निदान झाले. नेमकं याच दिवशी त्याचा डावा हात, चेहरा, पायावर छोटे आणि वेदनादायी फोड दिसून आले. या फोडांचे काही दिवसांनंतर पुरळांमध्ये रुपांतर झाले.

त्यानंतरयया या रुग्णाला सॅन मार्को विद्यापीठ रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्याच ठिकाणी त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या लैंगिक आजारांशी संबंधित इतर टेस्टही करण्यात आल्या. त्यामध्ये तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. येथील डॉक्टरांच्या मते या व्यक्तीला नुकताच एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे.

कोरोना, मंकीपॉक्समधून सुटका

या रुग्णाच्या शरीरावरील मंकीपॉक्सचे पुरळ काही दिवसानंतर गेले. कोरोना रिपोर्टसुद्धा निगेटीव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस त्याला विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. कारण तज्ञांच्या मते, कोरोना आणि मंकीपॉक्सचे लक्षणे कधीकधी ओव्हरलॅप होऊ शकतात. खासकरून मंकीपॉक्स झाल्यानंतर 20 दिवसांनी तो पुन्हा संक्रमित होण्याची अधिक शक्यता असते.

 

Back to top button