इस्रायलचा पॅलेस्टाईनवर एअरस्ट्राईक | पुढारी

इस्रायलचा पॅलेस्टाईनवर एअरस्ट्राईक

तेल अवीव/ गाझा ः वृत्तसंस्था इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये अद्यापही संघर्ष सुरूच आहे. इस्रायलने शुक्रवारी गाझापट्टीत एअरस्टारईक केला. यामध्ये पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या संघटनेचे टॉप कमांडर तायसीर अल जबारी ठार झाला. या हल्ल्यात अन्य 10 जण ठार झाले आहेत तर 70 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक या संघटनेचा नेता बहा अबू अल्-आता याची अटक आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पॅलेस्टाईनने इस्रायलला हल्ला करण्याची धमकी दिली होती. 2019 मध्ये इस्रायलच्या लष्कराने अल-अताला मारले होते. त्यानंतर सातत्याने पॅलेस्टाईनकडून धमकी दिली जात होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता इस्रायलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला आहे.

दरम्यान, गाझापट्टीत इस्रायलच्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दोन तासांत पॅलेस्टाईनकडून 100 रॉकेट डागण्यात आली. त्यातील 9 रॉकेट गाझापट्टीत पडली. या हल्ल्यात पाच वर्षांच्या मुलासह 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे ‘हमास’ या संघटनेकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात हमासच्या 15 दहशतवाद्यांना ठार केले असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

काय आहे वादाचे कारण?

मध्यपूर्वेतील संघर्ष गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे.वेस्ट बँक, गाझापट्टी आणि गोलन हायट्स या भागांवरून वाद आहे. जेरूसलेम या भागांवर पॅलेस्टाईनकडून नेहमीचा दावा सांगितला जात आहे. तर जेरूसलेमचा दावा सोडण्यास इस्रायल तयार नाही. गाझापट्टीवर सध्या हमासचा कब्जा आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझापट्टीतून आपले सैन्य मागे घेतले होते. 2007 मध्ये इस्रायलने गाझापट्टीवर कडक निर्बंध घातले होते. वेस्ट बँक आणि गाझापट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाची स्थापना व्हावी, अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे.

हेही वाचा 

Back to top button