पुढारी ऑनलाईन डेस्क : जग अजूनही कोरोनाच्या सावटातून बाहेर पडलेले नसतानाच मंकीपॅाक्स या आजाराचे रुग्ण विविध देशांत आढळत आहेत. भारतातील केरळ राज्यातही मंकीपॅाक्स पोहोचला आहे. तर दुसरीकडे घाना या देशात 'मारबुर्ग'ची हा नवा व्हायरस दिसून आला आहे. याची लागण झालेल्या दाेन रुग्णांचा आजाराने मृत्यू झाला आहे.
हा व्हायरस इबोलासारखा आहे. हा आजार वेगाने फैलावू शकतो. मारबुर्ग या आजाराचे घानात दाेन रुग्ण आढळले आहेत. १० जुलै राेजी या रुग्णांच्या तपासण्या पॉजिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर सेनेगल येथील प्रयोगशाळेत नमुन्यांची पुन्हा पडताळणी करण्यात आली.
घानाच्या आरोग्य विभागाने रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना विलग केले असून, हा आजार पसरू नये याची काळजी घेतली जात आहे. सध्या तरी रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. पश्चिम आफ्रिकेतील मारबुर्गची ही दुसरी नोंद आहे. यापूर्वी गिनिया या देशात गेल्या वर्षी या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. सध्या जे रुग्ण आढळले आहेत त्यांना उलट्या, जुलाब, मळमळणे अशी लक्षणं आढळली आहेत.
हेही वाचा