Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली; आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाची केली तोडफोड | पुढारी

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली; आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाची केली तोडफोड

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेतील (Sri Lanka Crisis) परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. शनिवारी (९ जुलै) आंदोलकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या निवासस्थानी घुसले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड हटवून राष्ट्रपती भवनात शिरत राष्ट्रपतींच्या निवासस्थानाची मोडतोड केली. यावेळी घुसलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार देखिल केला. यावेळी जमावाने राष्ट्रपती भवनात घूसन मोठा गदारोळ घातला.

राष्ट्रपतींचे पलायन (Sri Lanka Crisis)

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाजवळ मोठा घोळका जमा झाला. यावेळी राष्ट्रपती राजपक्षे यांच्या विरुद्ध मोठी घोषणा बाजी करण्यात आली. आंदोलकांचा आक्रमकपणा पाहुण राष्ट्रपती राजपक्षे यांनी शनिवारी आपले अधिकृत निवासस्थान सोडून राजधानीतून पलायन केले. याबाबतची माहिती रक्षा विभागातील सुत्रांकडून प्राप्त झाली. यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात शिरुन तोडफोड केली. धोक्याची पुर्वघंटा लक्षातघेत राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आधीच पोबारा केला.

पोलिसांशी भिडले आंदोलक (Sri Lanka Crisis)

आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात अक्षरशा: धुडगूस घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन पोलिसांसह ३० लोक जखमी झाले आहेत. तसेच राष्ट्रपती भवनाला संरक्षण देण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेटस आंदोलकांनी तोडून टाकले.

राष्ट्रपतींच्या स्विमिंग पूलमध्ये आंदोलकांच्या उड्या (Sri Lanka Crisis)

आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाची तोडफोड तर केलीच शिवाय यावेळी राष्ट्रपती आवासातील स्विमिंग पूलमध्ये आंदोलकांनी उड्या टाकत पोहण्याचा आनंद देखिल लूटला.

पंतप्रधनांनी घेतली तातडीची बैठक

राष्ट्रपती भवनाची आंदोलकांकडून झालेल्या तोडफोडीनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावली. यावेळी पंतप्रधानांनी संसदेच्या अध्यक्षांना संसदेचे अधिवेशन तात्काळ बोलवण्याची विनंती केली आहे.

श्रीलंकेतील अनेक शहरात संचारबंदी

श्रीलंकेतील पश्चिम प्रांतामधील नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लाविनिया, उत्तर कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेट्रल या ठिकाणी आधीपासून संचारबंदी लागू होती. पण, वकिल, मानवाधिकार संघटना आणि राजकीय पक्ष व संघटानांच्या दबावानंतर संचारबंदीमध्ये शिथिला लागू करण्यात आली होती. परंतु शनिवारी उडालेल्या भडके नंतर पुन्हा पुढील आदेश प्राप्त होण्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलिस महानिरीक्षक सी. डी. विक्रमरत्ने यांनी शुक्रवारी घोषणा करताना सांगितले की, ज्या ठिकाणी संचारबंदी लागू आहे तेथील नागरिकांनी घराबाहेर पडून नये. संचारबंदीचे उल्लंघन करण्यात आल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

Back to top button