पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक हवामान बदलाचा परिणाम हळूहळू पुढे येऊ लागला आहेत. जगातील सर्वात मोठं बेटावर जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम झालेला दिसून आला. आर्किटिक आणि अटलांटिक महासागराच्या दरम्यान असणाऱ्या सर्वात थंड आणि बर्फाळ ग्रीनलॅंडमध्ये (Greenland) मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या देशातील पावसाने इतिहासात कधीही नोंदविला नाही, असा रेकाॅर्ड नोंदवला आहे. ग्रीनलॅंडच्या सर्वात उंच अशा बर्फाळ पृष्टभागावर हा पाऊस पडला आहे.
ग्रीनलॅंडमध्ये पाऊस पडण्याचं कारण काय?
शास्त्रज्ञांनी बुधवारी ग्रीनलॅंडच्या (Greenland) सर्वात उंच अशा बर्फाळ भागात पाऊस पडल्याची पुष्टी केलेली आहे. अहवालानुसार ग्रीनलॅंडमध्ये सामान्यपणे वर्षभर बर्फच पडतो. अशा परिस्थितीत बेटाचं तापमान फ्रिजिंग पाॅईंटवर असतो. म्हणजेच शून्य अंश सेल्सियस तापमान असल्यामुळे पाण्याचा बर्फ होत राहतो. कधी-कधी त्याहीपेक्षा शून्यपेक्षाही खाली तापमान जातं.
पण, आता जागतिक हवामान बदलाचा परिणाम ग्रीनलॅंडपर्यंत पोहोचला आहे. या कारणामुळेच बेटवरील तापमान हे फ्रिजिंग पाॅंईटच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे ग्रीनलॅंडमध्ये पाऊस कोसळण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
ग्रीनलॅंडच्या नॅशनल स्नो एण्ड आईस डेटा सेंटरचे शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की, गेल्या दशकामध्ये आर्कटिक रिसर्च स्टेशनमध्ये बेटाच्या कुठल्याही क्षेत्रातील तापमान फ्रिजिंग पाॅईंटच्या वर जाण्याचा रेकाॅर्ड केलेला आहे. असं सांगितलं जात आहे की, बेटाच्या दक्षिण-पूर्व भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे.
ग्रीनलॅंडवर पडलेल्या पावसाचा जोर आणि रेकाॅर्ड पाहता शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण, या घटनेतून हे स्पष्ट झालं आहे की, जगभरात समुद्राचा स्तर वेगाने वाढत आहे. बर्फ वितळल्यामुळे समुद्राचं पाणी पातळीपेक्षा जास्त वाढत आहे.
१०, ५५१ फूट उंचीवर असणाऱ्या बर्फाळ डोंगरावर ७ अब्ज टन पाणी
डेटा सेंटरच्या माहितीनुसार ग्रीनलॅंडमध्ये सर्वात उंच ठिकाण हे १० हजार ५१ फूट उंट आहे. तिथलं तापमान हे कायम फ्रिजिंग पाॅईंटपर्यंत असते. मात्र, मागील आठवड्यात फ्रिजिंग पाॅईटच्या वर हे तापमान गेल्याची नोंद झाली आहे. अनुमान असं सांगितला गेला आहे की, या क्षेत्रात बर्फाळ डोंगरावर तीन दिवसांतच ७ अरब टन पाणी कोसळलं आहे.
ग्रीनलॅंडचा ६ लाख ५६ हजार वर्ग मीटर, या भागावर नेहमीच बर्फाची पातळी ही वाढते, कमी होते. सध्या जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर बर्फ वितळ्याची घटना वेगाने वाढली आहे. शास्त्रज्ञांकडून असं सांगितलं गेलं आहे की, ही बर्फ वितळण्याची परिस्थिती अशीच राहिली तर, आर्कटिक महासागर २०५० पर्यंत पृथ्वीवरील सर्व बर्फ वितळून जाण्याची शक्यता आहे.
याचे परिणाम इतके भयानक आहेत की, समजा ग्रीनलॅंडवरील संपूर्ण बर्फ वितळून गेला तर समुद्राची पातळी तब्बल २० फूटाने वाढू शकते. यातून समुद्र सपाटीपासून कमी उंचीची ठिकाणं बुडून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच चीनमधील शांघाय, एमस्टरडॅम आणि न्यूयाॅर्क या शहराच्य समुद्रकिनाऱ्यावरील भाग पूर्णपणे बुडून जाऊ शकतात.
पहा व्हिडीओ : कोरोना उपचारात रेडिऑलीजीचा वापर