नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, युद्धाची ठिणगी पडल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षण घेणार्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांना परतावे लागले होते. यामुळे अनेकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दरम्यान, शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतलेले विद्यार्थी रशियन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
नवी दिल्लीतील रशियन दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जाणार असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचा संबंधित अभ्यासक्रम सुरू ठेवणे शक्य होणार आहे. युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी युक्रेनमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला होता.
या निर्णयामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आली होती. शिष्यवृत्तीदेखील मिळणार रशियन फेडरेशनचे मानद कॉन्सुल आणि तिरुअनंतपुरममधील रशियन हाऊसचे संचालक रतीश नायर यांच्या मते, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती, त्यांना रशियन विद्यापीठांमध्येही शिष्यवृत्ती मिळू शकते. मात्र, युक्रेनमध्ये भरलेली फी येथील विद्यापीठांसाठी वैध असणार नाही.
हेही वाचा :