Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रांचा तुटवडा | पुढारी

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रांचा तुटवडा

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होऊन तीन महिने उलटून गेले असताना आता युक्रेनला शस्त्रांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. मायकोलाईव्हच्या गव्हर्नरनी युक्रेनी सैन्याकडे दारूगोळा शिल्लक नसल्याचे म्हटले आहे.

रशियाच्या हल्ल्यात मायकोलाईव्ह शहरातील गोदामांमध्ये ठेवलेले 3 लाख टन धान्य खराब झाले आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने रशिया 6.1 टन वजनाची जहाजरोधी क्षेपणास्त्रे वापरत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेने दिलेली रशियाच्या हल्ल्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष केले होते, असे म्हटले आहे. आम्ही युक्रेनला इशारा दिला होता. पण, झेलेन्स्की यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

युरोपीय संघाचे अध्यक्ष दुसर्‍यांदा कीव्हमध्ये

युरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन या दुसर्‍यांचा कीव्हच्या दौर्‍यावर आल्या आहेत. आगामी बैठकीत युक्रेनला युरोपीय संघाचे सदस्यत्व देण्यावर निर्णय होणार आहे. याबाबत त्या झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत.

जर्मनी, फ्रान्सचे नेते कीव्हला जाणार

जी-7 राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी जर्मनीची चान्सलर ओलाफ स्कॉल्झ या महिन्यात कीव्हचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button