इम्रान यांना धक्का लागला तर मंत्र्यांवर आत्मघाती हल्ले | पुढारी

इम्रान यांना धक्का लागला तर मंत्र्यांवर आत्मघाती हल्ले

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारने देशद्रोहप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे समर्थक खासदार अताउल्लाह यांनी शरीफ सरकारला कडक शब्दांत सुनावले आहे.

माझे नेते इम्रान खान यांच्या केसालाही धक्का लागला तर देश चालवणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. मी मंत्री व त्यांच्या मुलांवर आत्मघातकी हल्ला करणारी पहिली व्यक्ती असेन. मी तुम्हाला सोडणार नाही. आमचे हजारो कार्यकर्तेही तयार आहेत, अशी धमकी कराचीचे खासदार असलेल्या अताउल्लाह यांनी दिली आहे.

अताउल्लाह 2018 पासून खासदार असून ख्यातनाम वकीलही आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारविरोधात अशी विधाने केली आहेत. दरम्यान, अटकेच्या भीतीमुळे इम्रान खान यांनी आपल्या पीटीआय पक्षाचे सरकार असणार्‍या खैबर पख्तुंख्वामध्ये आश्रय घेतला आहेत. 25 मे रोजी केवळ एका दिवसासाठी ते इस्लामाबादला आले होते. त्यांच्या अटकेसाठी आतापासूनच देशात वातावरण तयार केले जात आहे.

Back to top button