5 कॅरेट हिर्‍याच्या अंगठीची भुरळ इम्रान खानच्या पत्नीला ; जाणून घ्या काय आहे बातमी | पुढारी

5 कॅरेट हिर्‍याच्या अंगठीची भुरळ इम्रान खानच्या पत्नीला ; जाणून घ्या काय आहे बातमी

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या लाचखोरीचे एक रहस्य समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही बुशरा बीबीच्या फराह खान उर्फ फराह गोगी या मैत्रिणीचीच चर्चा होत आहे, जी इम्रान सरकार पडण्याआधी इस्लामाबादहून दुबईला पळून गेली होती.

अब्जाधीश उद्योगपती मलिक रियाज आणि त्यांची मुलगी अंबर यांच्या संवादाची 2 मिनीट 17 सेकंदाची एक ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. रियाज हे पाकिस्तानातील मोठे भूखंडमाफिया मानले जातात. अंबर सांगते की, फराह गोगीशी बोलणे झाले आहे. तिने सांगितले आहे की, बुशरा बीबी को 3 नाहीतर 5 कॅरेटचा हिरा पाहिजे. रिंग ती स्वतः बनवून घेईल; पण त्याचे पैसे आपण चुकते करायचे. बुशरा आणि फराहने इम्रान साहेबांशी बोलणे केले आहे. त्यानंतर तत्काळ कंत्राटाच्या सर्व फाईल्स ओके होतील. त्यावर रियाज हे ठीक आहे, काही हरकत नाही. 5 कॅरेटचा हिरा पाठवून देऊयात, असे म्हणतात.

ज्या डायमंड रिंगची चर्चा झाली आहे, ती बुशरा बीबीच्या बोटांमध्ये दिसून आली आहे. कराचीत अब्जावधी रुपयांचे गृहप्रकल्प मंजूर झाले असून, त्यातील अनेक कंत्राटे रियाज यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

* इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीचा कारनामा
* अब्जाधीशाच्या ऑडिओ क्लिपमधून रहस्य उघड

Back to top button