वाहनाच्या धडकेने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

परिसरातील वातावरण तापले असून नागरिकांनी रस्ता बंद केला
A crowd gathered after a student studying in Class II died in an accident at Zilla Parishad School in Birobawadi
बिरोबावाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने जमलेले जनसमुदायपुढारी

पाटस : बिरोबावाडी (ता. दौंड) येथील पाटस-दौंड अष्टविनायक महामार्गावर दुसरीत शिकणाऱ्या लहान बालकाला चारचाकी पिकअपने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरातील वातावरण तापले असल्याने नागरिकांनी रस्ता बंद केला. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीच्या लांब रांगा लागल्या आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आयुश राजेश यादव (वय ८) असे आहे. ही घटना बिरोबावाडी येथील अष्टविनायक रस्त्यावरील मुख्य चौकात घडली. याच चौकात जिल्हा परिषद शाळा आहे. त्याची आई मुलीला व मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना पाटसवरून दौंड दिशेने वेगात जाणाऱ्या पिकअपने रस्ता क्रॉस करत आसता विद्यार्थ्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेच्या चौकात अष्टविनायक महामार्गावर गतिरोधक करण्याची मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली. यामुळे त्यांनी दौंड पाटस अष्टविनायक रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना शांत करण्यासाठी यवत, पाटस पोलिस प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news