अरे बाप रे! १२ लाख खर्च करून ‘तो’ दिसू लागला चक्क कुत्र्यासारखा

अरे बाप रे! १२ लाख खर्च करून ‘तो’ दिसू लागला चक्क कुत्र्यासारखा

पुढारी ऑनलाईन डेस्क : हौसेला मोल नसते आणि कशाची हौस असावी यालाही काही मर्यादा नाहीत. जपानमधील एक तरुणाला कुत्र्यासारखं दिसायचं होतं आणि त्यासाठी पैसे मोजायला तयार होता. त्याची ही हौस भागवण्यासाठी जपानमधील वेशभुषा बनवणाऱ्या कंपनीने ४० दिवस खर्च करून १२ लाखांचा खास पोशाख बनवला आहे. यामुळे हा तरुण सेम टू सेम कुत्रा दिसत आहे. या तरुणाला कुली जातीचा कुत्रा दिसायचं होतं, त्यामुळे हा पोशाखही तसाच तयार केला आहे.

'टोको इव्ह' असे या हौशी तरुणाचे नाव आहे. त्याने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्याचे रूप पाहून नेटिझन्सही बुचकळ्यात पडले आहेत. झेपपेट या कंपनीने हा पोशाख बनवला आहे. टोको म्हणाला, "मला प्राणी फार आवडतात आणि कुत्र्यासारखं दिसायची  इच्छा होती. कुली या जातीच्या कुत्र्यांचे केस लांब असतात आणि तो मोठाही असतो, त्यामुळे मी कुलीची निवड केली." या पोशाखात हात-पायांची हालचाल फार करता येत नाही, जर केली तर मी कुत्र्यासारखा दिसणार नाही, असे तो गंमतीने म्हणाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news