बिल गेट्स, बराक ओबामा यांच्यासह अमेरिकेतील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक  | पुढारी

बिल गेट्स, बराक ओबामा यांच्यासह अमेरिकेतील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. ट्विटर हॅक केल्यानंतर एक मेसेज पोस्ट करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे तसेच जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलच्या महत्त्वाच्या खात्यांचेही अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

वाचा : अमेरिकेचा चीनला जोरदार दणका; ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर केली स्वाक्षरी 

या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यानंतर काही वेळानं ट्विटरनं एक ट्विट करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहितीही दिली.

तुम्ही आम्हाला जेवढे बिटकॉइन देणार त्या दुप्पट बिटकॉइन आम्ही देणार असे या ट्विट मध्ये म्हटले आहे. ॲपलच्या अकाउंटवरुनही मेसेज देण्यात आला आहे. आम्हाला तुम्हाला काही देण्यासाठी ईच्छुक आहोत. तुम्ही आम्हाला पाठींबा देणार अशी अपेक्षा आहे असे ॲपलच्या ट्विटर हॅडवरुन पोस्ट करण्यात आला होता. तुम्ही आम्हाला जेवढे बिटकॉईन पाठवणार त्याच्या दुप्पट तुम्हाला आम्ही बिटकॉईन देणार ही ऑफर फक्त ३० मीनिटासांठी असल्याचेही यात म्हटले होते.  

वाचा : ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय, कोरोना योद्ध्यांना ६८ हजार कोटी पगारवाढ

 

Back to top button