पाकिस्तानच्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही : जेमिमा

पाकिस्तानच्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही : जेमिमा

लंडन; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्या लंडन येथील घरासमोर रविवारी पाकिस्तान मुस्लिम लीग आंदोलनावरून नाराजी व्यक्‍त केली आहे. मात्र, आता मुस्लिम लीगने आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

'मला वाटते सध्या 90 चे दशक असून मी लाहोरमध्ये आले असल्याचे वाटत आहे. इम्रान अथवा माझा भाऊ जॅक गोल्डस्मिथ यांच्या राजकारणाबाबत माझे काहीच देणेघेणे नाही. माझ्या मुलांनी सुद्धा पाकिस्तानातील राजकारणाबाबत आतापर्यंत काहीच वक्‍तव्य केलेले नाही', असे जेमिमाने ट्विट केले आहे. जेमिमाच्या या पोस्टला काही युझर्सनी ट्रोलसुद्धा केले आहे.

इम्रान खान यांनी 1995 मध्ये जेमिमाशी लग्‍न केले. मात्र 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर जेमिमा पाकिस्तान सोडून लंडनमध्ये स्थायिक झाली होती. त्यावेळी तिला अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, जेमिमाचा भाऊ जॅक गोल्डस्मिथ ब्रिटनमधील राजकीय नेते आहेत. 2010 मध्ये इम्रान खान जॅक यांच्या प्रचाराला ब्रिटनला गेले होते.

इम्रान खान यांचा अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतर जॅक यांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. पाकिस्तानमध्ये 9 एप्रिल रोजी झालेल्या घटनेबद्दल मला अतीव दुःख झाले आहे. इम्रान खान काही मोजक्याच इमानदार नेत्यांपैकी एक आहेत. आगामी निवडणुकीत इम्रान खान यांचा विजय होणार असल्याचे ट्विट जॅक यांनी केले होते. दरम्यान, पाकिस्तानातील लोकशाही व्यवस्थेचा आम्ही सन्मान करतो. इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वास ठराव हा पाकिस्तानातील अंतर्गत मामला असून त्यामध्ये ब्रिटनला हस्तक्षेप करण्याचा काही हेतू नसल्याचे ब्रिटन सरकारने जॅक यांच्या ट्विटनंतर स्पष्टीकरण दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news